आणखी एका युवतीला मारले: राहुल गांधी

वृत्तसंस्था
Tuesday, 29 September 2020

'उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका युवतीला मारले आहे,' असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

नवी दिल्ली: 'उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका युवतीला मारले आहे,' असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

...म्हणून नवरी झाली विवाहापूर्वीच व्हायरल

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवतीचा दोन आठवड्यानंतर आज (मंगळवार) उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. या घटनेबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी योगी सरकारवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. गांधी म्हणाले, 'उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका युवतीला मारून टाकले. सरकारने म्हटले की फेक न्यूज आहे आणि पीडितेस मरण्यासाठी सोडून दिले. मात्र, ही दुर्देवी घटना खोटी नव्हती, पीडितेचा मृत्यूही आणि सरकारचा निर्दयीपणा देखील खोटा नव्हता.'

दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखे हे प्रकरण असून, चार तरुणांनी एका युवतीवर बलात्कार करुन, तिची जीभ कापली होती. शिवाय, तिची मान मोडल्याचा अत्यंत संतापजनक व अमानुष प्रकार घडला आहे. यामुळे अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीची दोन आठवड्यांपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर आज तिची प्राणज्योत मालवली. पीडित युवतीने चार युवकांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे जबाबात सांगितले होते. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uttar pradesh special class jangal raj kills another one girl says rahul gandhi