

Yogi Government announces a major price hike of ₹30 per quintal, fulfilling a long-standing demand
Sakal
₹3000 Crore Additional Benefit for Cane Farmers : उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयानुसार, आता ऊसाच्या दरात ₹३० प्रति क्विंटलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास ₹३,००० कोटींचा अतिरिक्त फायदा मिळणार आहे. योगी सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक मोठे वरदान ठरणार असून, यामुळे त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे.