
Uttar Pradesh
esakal
उत्तर प्रदेशातील शिक्षकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले आहे की, आता सर्व शिक्षक, शिक्षामित्र, अनुदेशक आणि शाळांतील स्वयंपाकी यांना कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे 9 लाख कुटुंबांना होणार आहे.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने शिक्षकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की ही सुविधा प्राथमिक, उच्च प्राथमिक व अनुदानित शाळांमध्ये कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना मिळेल.