

UP Government Hikes Marriage Assistance for Labourers
Sakal
UP Government : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील बांधकाम मजुरांच्या हितासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य भवन आणि इतर सन्निर्माण कर्मकार कल्याण बोर्डामार्फत चालवल्या जाणाऱ्या ‘कन्या विवाह सहायता योजने’च्या आर्थिक मदतीच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील जवळपास एक कोटी ऐंशी लाखांहून अधिक नोंदणीकृत मजुरांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.