सोशल मीडियाची कमाल! व्हिडीओवर केलेल्या एका कमेंटमुळे हरवलेला मुलगा सापडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

You Tube

सोशल मीडियाची कमाल! व्हिडीओवर केलेल्या एका कमेंटमुळे हरवलेला मुलगा सापडला

आग्रा येथील शमशाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक मुलगा नाराज होवून घरातून कोणाला न सांगता निघून गेला होता. तो रस्ता चुकला आणि भटकत शमशाबाद पोलीस स्टेशन परिसरात गेला. तेथील स्थानिकांनी 12 वर्षीय शाहबाजला पोलिस ठाण्यात सोपवले. यानंतर पोलिसांनी त्या लहान मुलांची चौकशी केली असता. त्याला घरचा पत्ता सांगता येत नव्हता. त्यामुळं पोलिसांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला.

त्यानंतर पोलिसांना समजले की, शाहबाजचा मोठा भाऊ अरमान एक यूट्यूब चॅनल चालवतो आणि हे यूट्यूब चॅनल मुलाच्या कुटुंबीयांना भेटण्याचे माध्यम बनेल. पोलिसांनी लगेच ते यूट्यूब चॅनल शोधले. त्या यूट्यूब चॅनलवर एक मोबाईल नंबर सापडला आहे. पोलिसांनी नंबर डायल केला असता तो बंद होता. यानंतर पोलिसांनी शाहबाजच्या भावाच्या 2 दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडिओवर कमेंट केली.

हेही वाचा: कर्ज परतफेडीच्या नियोजनाचे पाच मार्ग...

कमेंटमध्ये लिहिले, "अरमान, तुझा नंबर पाठव, मला तुझ्या भावा बद्दल बोलायचे आहे. कमेंट वाचून अरमानने त्याचा फोन नंबर दिला. त्यानंतर शमशाबाद पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या कॉन्स्टेबलशी बोलणं झाल. पोलिसांनी अरमानला सांगितले की, त्याचा भाऊ शमशाबाद पोलीस ठाण्यात आहे.

तो रस्ता भटकत तो शमशाबादला पोहोचला आहे. माहिती मिळताच अरमानने कुटुंबासह शमशाबाद पोलीस ठाणे गाठले. पोलीसांनी शाहबाजला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. शाहबाजला भेटल्यानंतर कुटुंबीय खूप आनंदी झाले.

टॅग्स :Madhya Pradeshpolice case