Uttarakhand Election: ‘आप’च्‍या कामगिरीकडे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uttarakhand Assembly Election Updates
Uttarakhand Election: ‘आप’च्‍या कामगिरीकडे लक्ष

Uttarakhand Election: ‘आप’च्‍या कामगिरीकडे लक्ष

भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण वर्चस्‍व असलेल्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने उडी घेऊन मोठी रंगत आणली आहे. दिल्‍लीत भाजप आणि काँग्रेसला जेरीस आणलेला ‘आप’ उत्तराखंडात आपली जादू दाखवणार का याकडे साऱ्या देशाचे लक्ष असेल. (Uttarakhand Assembly Election Updates)

सन २००० मध्ये स्‍थापन झालेले भारताचे हे २७ वे राज्‍य आत्तापर्यंत विधानसभेच्‍या चार निवडणुकांना सामोरे गेले आहे. येथील जनतेने आत्तापर्यंत दोन वेळा काँग्रेसला आणि दोन वेळा भाजपला अशी समसमान संधी दिली आहे. २०१७ च्‍या गतनिवडणुकीत मोदी (Narendra Modi) लाटेवर स्‍वार झालेल्‍या येथील जनतेने भाजपला अक्षरशः हिमालयाच्‍या टोकावर, तर काँग्रेसला दरीत गाडले होते. या निवडणुकीत भाजपने ७० पैकी तब्‍बल ५७ जागा जिंकल्‍या होत्‍या. काँग्रेसला केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले होते, तर मायावतींच्‍या बसपला खातेही खोलता आले नव्‍हते.

हिंदूच्‍या पवित्र धार्मिक पर्यटनस्‍थळांमुळे उत्तराखंड प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो भाविक ऋषिकेश, हरिद्वारला भेट देत असतात. नैनिताल-डेहराडूनचा निसर्गही जगभरातील पर्यटकांना खुणावतो. राज्‍याचा मोठा आर्थिक भाग या पर्यटनावर अवलंबून आहे. या पर्यटनस्‍थळांचा विकास आणि स्‍थानिक लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठीच्‍या भौतिक सुविधा या दोन टप्‍प्‍यांवर कोणत्‍याही राज्‍य सरकारला येथे योजना आखाव्‍या लागतात. आतापर्यंत दोन-दोन वेळा सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि भाजपला लोकांच्‍या या अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. गेली पाच वर्षे पाशवी बहुमतात सत्तेत असलेल्या भाजपनेही विकासाच्‍या या दोन्‍ही टप्‍प्‍यांवर जनतेचा भ्रमनिरासच केला आहे.

हेही वाचा: युपीमध्ये निवडणुका जाहीर होताच आरोप प्रत्यारोपांच्या फैरींना सुरुवात

या साऱ्या पार्श्वभूमीवर यावेळच्‍या निवडणुकीत उत्तराखंडच्‍या जनतेला आपच्या रुपाने तिसरा पर्याय उपलब्‍ध झाला असला, तरी भाजपचे आव्‍हान मोडून टाकणे केजरीवाल यांच्यासाठी सध्या तरी सोपी गोष्ट नाही. दिल्‍लीतील कारभारामुळे सुधारलेली प्रतिमा या एकमेव भांडवलावर केजरीवाल भाजपला उत्तराखंडात किती जेरीस आणणार हे पाहणे रंजक ठरेल. गत निवडणुकीत झालेल्या पानिपतानंतर काँग्रेस येथे उभारी घेऊ शकलेली नाही. अंतर्गत कलह ही कॉग्रेसची देशव्‍यापी डोकेदुखी आपल्‍याला या देवभूमीतही दिसते. त्‍यातून हा पक्ष सावरणार की नाही हे या निवडणुकीत दिसेल. तीन तिघाड, काम बिघाड हे या निवडणुकीसाठीचे काँग्रेसचे थीम सॉंग आहे. राज्‍यात होणाऱया या तिरंगी लढतीत काम भाजपचे बिघडणार का काँग्रेसचे हेच पाहिले जाणार आहे. कारण राज्‍यात प्रथमच जोरकसपणे उतरलेल्‍या आपला राज्‍यातला दुसरा मोठा पक्ष बनण्याची संधी या निवडणुकीत स्‍पष्टपणे दिसते आहे. तेवढे झाले तरी केजरीवाल यांची अपेक्षापूर्ती होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल या तिन्‍ही नेत्‍यांच्‍या मोठ्या सभा राज्‍यात ठिकठिकाणी झाल्‍या आहेत. मोदींनी नुकतीच १७ हजार कोटींच्‍या विविध विकासकामांची भूमीपूजने केली आहेत. काँग्रेस आणि आपनेही पर्यटन विकास, बेरोजगारी या प्रश्‍नांवर आश्‍वासने दिली आहेत. आपने कर्नल अजय कोठियाल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक घोषित होण्याआधीच २४ उमेदवारींची यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. भाजपचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी आणि कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनीही राज्याच्या सर्व भागात दौरे आटोपले आहेत. निवडणूक या तीन प्रमुख पक्षांत होत असली तरी खरी लढत भाजप आणि आप या दोन पक्षांतच आहे. उत्तराखंडाचा विचार करताना देशाची नजर मात्र आपच्‍या कामगिरीकडेच असेल.गत निवडणुकीत झालेल्या पानिपतानंतर काँग्रेस येथे उभारी घेऊ शकलेली नाही. अंतर्गत कलह ही कॉग्रेसची देशव्‍यापी डोकेदुखी आपल्‍याला या देवभूमीतही दिसते. त्‍यातून हा पक्ष सावरणार की नाही हे या निवडणुकीत दिसेल. ‘तीन तिघाड, काम बिघाड’ हे या निवडणुकीसाठीचे काँग्रेसचे थीम साँग आहे. राज्‍यात होणाऱ्या या तिरंगी लढतीत काम भाजपचे बिघडणार का काँग्रेसचे हेच पाहिले जाणार आहे. कारण राज्‍यात प्रथमच जोरकसपणे उतरलेल्‍या आपला राज्‍यातला दुसरा मोठा पक्ष बनण्याची संधी या निवडणुकीत स्‍पष्टपणे दिसत आहे.

हेही वाचा: ओमिक्रॉन संसर्गाकडे दुर्लक्ष नको; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

तेवढे झाले तरी केजरीवाल यांची अपेक्षापूर्वी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल या तिन्‍ही नेत्‍यांच्‍या मोठ्या सभा राज्‍यात ठिकठिकाणी झाल्‍या आहेत. मोदींनी नुकतीच १७ हजार कोटींच्‍या विविध विकासकामांचे भूमिपूजन केले आहे. काँग्रेस आणि आपनेही पर्यटन विकास, बेरोजगारी या प्रश्‍नांवर आश्‍वासने दिली आहेत.

‘आप’ने कर्नल अजय कोठियाल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक घोषित होण्याआधीच २४ उमेदवारींची यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. भाजपचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनीही राज्याच्या सर्व भागात दौरे आटोपले आहेत. निवडणूक या तीन प्रमुख पक्षांत होत असली तरी खरी लढत भाजप आणि आप या दोन पक्षांतच आहे. उत्तराखंडाचा विचार करताना देशाची नजर मात्र आपच्‍या कामगिरीकडेच असेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top