Uttarakhand : एका आठवड्यानंतर तपोवन बोगद्यात सापडले दोन मृतदेह; 33 जणांचा शोध जारी

uttarakhand
uttarakhand
Updated on

चमोली : उत्तराखंडमधील चमोलीमध्ये हिमकडा तुटण्यामुळे महापूर आला होता. यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वित्तहानीसह मोठ्या प्रमाणावर जिवीत हानी झाल्याचीही शक्यता आहे. बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरु आहे. बचावरकार्यात अनेक अडचणी येत आहेत. मात्र, तरीही उत्तराखंड पोलिस, SDRF आणि NDRF चे जवान बचावकार्यात सामील आहेत.  

उत्तराखंडमधील चमोलीतील दुर्घटनेच्या एका आठवड्यानंतर आता तपोवन जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातून दोन मृतदेह मिळाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला मृतदेह सकाळी जवळपास पाच वाजता मिळाला. यानंतर थोडं आणखी खोदल्यानंतर दुसरा मृतदेह देखील प्राप्त झाला. मात्र, अद्यापही 33 बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे.

या बोगद्यात काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या बोगद्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे की जेसीबीच्या द्वारे युद्धपातळीवर काम करुनही बचावकार्यात बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 164 लोक बेपत्ता आहेत. अद्याप रैणी आणि तपोवन भागातून 38 आणि बोगद्यातून दोन मृतदेह सापडले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Election Results 2026 Live Updates Across India and Maharashtra Bypolls
Tamil Nadu Assembly Results
Counting of votes underway for West Bengal and other state assembly elections as early trends show BJP leading in key regions.
sugarcane ethanol production increase India
Marathi News Esakal
www.esakal.com