Indian Soldier
esakal
चमोलीतील थरली येथे लष्करी जवानाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.
मुलीच्या आईने सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ करत घटना उघड केली.
पोलिसांनी आरोपी जवानाला अटक करून तपास सुरू केला आहे.
Chamoli Incident : उत्तराखंडमधील चमोली येथे एका लष्करी जवानावर मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या आईने सोशल मीडियावर या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ केल्यामुळे ही घटना उघडकीस आली. पीडितेच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून आरोपी सैनिकाविरुद्ध गुन्हा दाखल (Police Filed FIR) करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटकही (Uttarakhand Soldier Arrested) केली आहे.