

Char Dham Helicopter Service
sakal
उत्तराखंड : उत्तराखंडमधील चारधाम यात्रेच्या अंतिम टप्प्यात चार्टर्ड हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आली आहे. हेलिकॉप्टरमध्ये को-पायलट असणे अनिवार्य करण्याच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) निर्णयावरून नियामक आणि हेलिकॉप्टर ऑपरेटर्स यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. या वादावर झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने यंदाच्या यात्रेतील उर्वरित काळासाठी चार्टर्ड उड्डाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही सेवा आता पुढील वर्षीच्या चारधाम यात्रेतच पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
चमोली जिल्ह्यात झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने डीजीसीएने चार्टर्ड उड्डाणांसाठी को-पायलट अनिवार्य केला होता. मात्र, ऑपरेटर कंपन्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. नवीन नियमांनुसार उड्डाणे करण्यास कंपन्यांनी नकार दिल्याने सेवा बंद झाली आहे.