
डेहराडून : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप पाहावयास मिळाला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या घटनांमुळे गेल्या २४ तासांत पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण बेपत्ता झाले आहेत. भूस्खलनामुळे तब्बल तीस ते चाळीस कुटुंब ढिगाऱ्याखाली दबले गेले आणि घरांची पडझडही झाली आहे. चमोली, रुद्रप्रयाग, टिहरी आणि बागेश्वर जिल्ह्यांत हाहाकार माजला आहे.