
Uttrakhand
esakal
Uttarakhand CM Dhami’s Ultimatum to End Copying Mafia :
उत्तराखंडमध्ये धामी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नकल माफियांविरोधात कंबर कसली आहे. धामी सरकारने सांगितले आहे की, राज्यात नकल माफियांची कंबर मोडण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडमध्ये नकल माफियांना कायमचं संपवण्याचा इशारा दिला आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, राज्यात कठोर नकलविरोधी कायदा लागू करण्यात आलेला आहे.
तरीदेखील कोचिंग माफिया आणि नकल माफिया एकत्र येऊन "नकल जिहाद" छेडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सरकार हे नकल जिहादी कोणत्याही परिस्थितीत जमीनदोस्त करणारच आहे, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.