Pushkar Singh Dhami : बस स्टँडवर घाण पाहून मुख्यमंत्री झाले संतप्त; स्वतः झाडू उचलून केली सफाई, नागरिकांकडून घेतला फीडबॅक!

Administrative Action : सचिवालयातून निघाल्यावर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी थेट आयएसबीटीवर पोहोचले. त्यांना अचानक आलेले पाहून अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर प्रवासी सुविधा, संचालन व्यवस्था आणि व्यवस्थापनाचा बारकाईने आढावा घेतला.
Uttarakhand CM Pushkar Singh Dhami personally cleans Dehradun ISBT and inspects facilities

Uttarakhand CM Pushkar Singh Dhami personally cleans Dehradun ISBT and inspects facilities

Sakal

Updated on

उत्तराखंड : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मंगळवारी डेहराडूनच्या इंटर-स्टेट बस टर्मिनल (ISBT) वर पसरलेली प्रचंड घाण पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी त्यांनी थेट झाडू उचलला आणि स्वतः सफाई करायला सुरुवात केली. मुख्यमंत्री अचानक तपासणीसाठी आयएसबीटीवर पोहोचले होते. तेथील परिस्थिती पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की, "पुढच्या वेळी येईन, तेव्हा सर्व व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे." यानंतर त्यांनी बसमध्ये बसून प्रवाशांकडूनही सुविधांबद्दल थेट अभिप्राय (Feedback) घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com