esakal | 'आप'ची नजर उत्तराखंडवर, मोफत वीजेच्या आश्वासनावर CM धामींचं केजरीवालांना उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

'आप'ची नजर उत्तराखंडवर, मोफत वीजेच्या आश्वासनावर CM धामींचं केजरीवालांना उत्तर

'आप'ची नजर उत्तराखंडवर, मोफत वीजेच्या आश्वासनावर CM धामींचं केजरीवालांना उत्तर

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे उद्या रविवारी उत्तराखंडला जात आहेत. अरविंद केजरीवाल यांनी स्वत: या उत्तराखंड दौऱ्याविषयीची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटलंय की उत्तराखंड स्वत: वीजेची निर्मिती करतो आणि दुसऱ्या राज्यांना त्याची विक्री करतो तरीही उत्तराखंडच्या लोकांना मिळणारी वीज इतकी महाग का? दिल्ली स्वत: वीजेची निर्मिती करत नाही, दुसऱ्या राज्यांकडून त्याची खरेदी करतो. तरी देखील दिल्लीमध्ये वीज मोफत मिळते. उत्तराखंडमधील रहिवाशांना मोफत वीज मिळायला नको का? उद्या देहरादूनमध्ये भेटू. असं त्यांनी ट्विट केलंय. अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच उत्तराखंडच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे.

हेही वाचा: भाजपचे ‘एकला चलो’, आघाडीत झाली बिघाडी!

त्यांच्या या ट्विटबद्दल उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी म्हटलंय की, त्यांचा हा निवडणुकीसाठीचा अजेंडा असेल मात्र, आमचा अजेंडा हा राज्यातील लोकांसाठी चांगलं काम करणं हा आहे. आम्ही फक्त निवडणुकांसाठी काम करत नाही. विकास हे एकच आमच्यासमोरचं आव्हान आहे.

हेही वाचा: हरभजन-गीता दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

अरविंद केजरीवाल आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठीच ते गेल्या काही दिवसांपूर्वी गुजरात आणि पंजाब दौऱ्यावर होते. या दोन्ही राज्यांमध्ये 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. केजरीवाल आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना या निवडणुकांसाठी प्रेरित करत आहेत. गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांत आपने चांगली कामगिरी केलीय. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपची नजर उत्तर प्रदेशवर देखील आहे. तर उत्तराखंडमध्ये हळूहळू आपला वावर वाढवण्याचा पक्षाचा मानस आहे.

loading image