esakal | हरभजन-गीता दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
sakal

बोलून बातमी शोधा

1

हरभजन-गीता दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: भारताचा प्रसिद्ध फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि अभिनेत्री गीता बसरा (Geeta Basra) यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. हरभजन सिंग आणि गीता बसरा दुसऱ्यांदा आई-बाबा (father-mother) झाले आहेत. गीता बसराने शनिवारी मुलाला जन्म दिला. हरभजन सिंगने टि्वट करुन मुलाच्या जन्माची माहिती दिली. या जोडप्याला एक मुलगी असून तिचे नाव हिनाया (Hinaya) आहे. जुलै २०१६ मध्ये हिनायाचा जन्म झाला. (Geeta Basra Harbhajan Singh welcome second child blessed with a baby boy) (सविस्तर वृत्त लवकरच)

"आम्हाला खूप खास आणि सुंदर भेट मिळाली आहे. आम्ही मनापासून आनंदी आहोत. आमचं आयुष्य आता पूर्ण झालं आहे" असं हरभजन सिंगने म्हटलं आहे. "ईश्वराने आम्हाला मुलाच्या रुपाने आशिर्वाद दिला असून त्या बद्दल मी देवाचे आभार मानतो. गीता आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत" अशी माहिती हरभजनने दिली आहे. "आम्ही खूप आनंदात आहोत. आम्हाला आमच्या हितचिंतकांकडून सतत प्रेम आणि पाठिंबा मिळाला, त्या बद्दल आम्ही आभारी आहोत" असे हरभजन सिंगने म्हटले आहे.

हेही वाचा: रूपाली भोसले ते भूषण प्रधान, 'फिटनेस फ्रिक' मराठी कलाकार

२९ ऑक्टोबर २०१५ रोजी हरभजनने अभिनेत्री गीता बसरा बरोबर लग्न केले. अनेक वर्षाच्या प्रेमसंबंधांनंतर दोघे विवाहबद्ध झाले. हरभजन पंजाब जालंधरचा राहणारा आहे. कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रीक घेणारा हरभजन पहिला गोलंदाज आहे. हरभजन केकेआरकडून शेवटचा आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता.

हेही वाचा: 'हे माझं तिसरं मूल'; करीनाने शेअर केला सोनोग्राफीचा फोटो

भारताचे २००७ साली टी-२० चा पहिला आणि त्यानंतर २०११ मध्ये वर्ल्डकप जिंकला. हरभजन या दोन्ही टीममध्ये होता. शेवटचे त्याने २०१६ मध्ये युएई विरुद्धच्या टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. सप्टेंबर महिन्यात यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएल २०२१ मध्ये खेळताना हरभजन दिसू शकतो.

loading image