Uttarakhand Election: ७६ रस्ते, २५ पूल.. उत्तराखंडला मोदींचे हजारो कोटींचे गिफ्ट

Uttarakhand Election: ७६ रस्ते, २५ पूल.. उत्तराखंडला मोदींचे हजारो कोटींचे गिफ्ट

Uttarakhand Election: देशातील तब्बल ५ विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आता प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. यातच मोदींनी उत्तराखंडला तब्बल 4 हजार 200 कोटी रुपयांची भेट दिली आहे.यात ७६ रस्ते, २५ पूल यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडला सुमारे 4 हजार 200 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची भेट दिली. यावेळी 23 महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी मोदींच्या हस्ते करण्यात आली. राज्यात २१ हजार ३९८ पॉलीहाऊस बांधणे, राज्यात 25 पुलांचे बांधकाम, अग्निसुरक्षा आदी गोष्टींचा समावेश आहे.

यावेळी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडच्या नागरिकांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पिथौरागढ जिल्ह्यात स्वागत केले. पिथौरागढ जिल्हा दोन आंतरराष्ट्रीय सीमेला लागून आहे.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अजय भट्ट, मंत्री सतपाल महाराज, गणेश जोशी, प्रेमचंद अग्रवाल, सुबोध उनियाल, डॉ धनसिंग रावत, रेखा आर्य, सौरभ बहुगुणा, खा. डॉ रमेश पोखरियाल, डॉ. निशंक, अजय टमटा, खा. नरेश बन्सल, कल्पना सैनी, भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या योजनांमध्ये प्रधान मंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत 76 रस्ते बांधण्यात येणार आहेत. याचबरोबर 25 पूल उभारले जाणार आहेत.

Uttarakhand Election: ७६ रस्ते, २५ पूल.. उत्तराखंडला मोदींचे हजारो कोटींचे गिफ्ट
PM Modi in Uttarakhand: पंतप्रधान मोदींना हिमालयाची भुरळ, पार्वती कुंडमध्ये केली ध्यानधारणा

यावेळी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे. मोदींच्या नेतृत्त्वात आपला देश केवळ समृद्ध आणि सक्षम झाला आहे. आज भारत जगाचे नेतृत्व करण्यासही सज्ज होत आहे.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारकडून उत्तराखंडसाठी तब्बल 1 लाख 50 हजार कोटींहून अधिकचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.यातील बरीचशी कामे पूर्ण होत आली आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात उत्तराखंडला देशातील सर्वोत्तम राज्य बनवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. यावेळी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एक नई सोच, एक नई पहल हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिले.

Uttarakhand Election: ७६ रस्ते, २५ पूल.. उत्तराखंडला मोदींचे हजारो कोटींचे गिफ्ट
PM Modi : सरकारमुळे देशभरात लाखो महिलांच्या नावे गृहनोंदणी : मोदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com