PM Modi in Uttarakhand: मोदी बनले आदि कैलासाचे दर्शन घेणारे पहिले प्रधानमंत्री, पार्वतीकुंडात केली ध्यानधारणा

adi kailas darshan modi
adi kailas darshan modiesakal
Updated on

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सर्वातआधी पिथ्थोरागड जिल्ह्यातील आदि कैलाशाचे दर्शन घेतले. पार्वती कुंडाचे दर्शन घेऊन आणि पूजा अर्चा केल्यानंतर ते जागेश्वर धामकडे रवाना झाले आहेत. पीटीआयने यासंदर्भातील माहिती दिली असून यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे.

पंतप्रधान मोदी यांचा एक दिवसाचा उत्तराखंड दौरा आहे. यावेळी ते विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. तसेत ते येथील जनतेशी संवाद साधतील. ते उत्तराखंडधील कुमाऊ भागाला भेट देणार आहेत.

adi kailas darshan modi
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २०३० पर्यंत भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार

पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टनुसार, 'भारतीय जनता पक्ष देवभूमी उत्तराखंडच्या सर्वांगीन आणि जलद विकासासाठी कटीबद्ध आहे. विकासाला चालणा देण्यासाठी मी आज पिथ्थोरागड येथे अनेक प्रकल्पांची पायाभरणी करणार आहे. तसेच यावेळी मी गुंजी गावातील नागरिकांशी संवाद साधणार आहे.'

adi kailas darshan modi
PM Kisan Yojana: सरकार घेणार मोठा निर्णय! निवडणुकीपूर्वी PM मोदी देणार शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट?

पंतप्रधान मोदी यांच्या उत्तराखंड दौऱ्यानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. सहा किलोमीटरचा रस्ता सुशोभीत करण्यात आला आहे. अनेक प्रकारच्या पेंटिंग याठिकाणी लावण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी पवित्र मानल्या जाणाऱ्या आदि कैलाश पर्वताला यावेळी भेट दिली. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.