
थोडक्यात
उत्तरकाशीच्या धराली येथे ढगफुटीमुळे १५१ महाराष्ट्रातील पर्यटक अडकले असून त्यापैकी ३१ जणांशी अजूनही संपर्क नाही.
१२० पर्यटक आयटीबीपी छावणीत सुरक्षित असून उर्वरितांचा शोध घेण्यासाठी उत्तराखंड प्रशासन प्रयत्नशील आहे.
मुख्यमंत्री फडणवीस परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पर्यटकांना रेल्वे किंवा हवाई मार्गे सुरक्षित परत आणण्याची व्यवस्था सुरू आहे.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे हाहाकार माजला असून महाराष्ट्रातील १५१ पर्यटक अडकले आहेत महाराष्ट्र सरकार पर्यटकांच्या सुरक्षित परतीसाठी योजना आखत आहे. तसेच, ते उत्तराखंड प्रशासनाशी सतत संपर्कात आहे. आतापर्यंत १२० पर्यटकांशी संपर्क साधण्यात आला असून हे पर्यटक इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) च्या छावणीत सुरक्षित आहेत. तर उर्वरित ३१ पर्यटकांचा संपर्क होऊ शकलेला नाही अशी माहिती समोर आली आहे.