काँग्रेसमध्ये BCCI चा फंडा; कॅप्टनसंदर्भात रावत म्हणाले... | Harish Rawat | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harish Rawat
काँग्रेसमध्ये BCCI चा फंडा; कॅप्टनसंदर्भात रावत म्हणाले...

काँग्रेसमध्ये BCCI चा फंडा; कॅप्टनसंदर्भात रावत म्हणाले...

देहरादून : काँग्रेसचे उत्तराखंडमधील वरिष्ठ नेते हरीश रावात (Harish Rawat) यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर बंडाचे निशान हातात घेतल्याने काँग्रेसची (Congress) पळापळ झाली होती. मात्र आता हरीश रावत यांनी आपले बंड थंड केले आहे. त्यांनी उत्तराखंड काँग्रेसमध्ये आता सगळे आलबेल असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी शुक्रवारी दिल्ली वारी करुन काँग्रेस हाय कमांडबरोबर चर्चा केली होती. त्यानंतरच रावत यांचा सूर बदलला आहे. आपले सूर आता बदलले असल्याचे सांगण्याच्या नादात त्यांनी काँग्रेसची तुलना बीसीसीआयशीच (BCCI) करुन टाकली.

हेही वाचा: ...तर आम्ही पुन्हा कृषी कायदे लागू करू; केंद्रीय कृषी मंत्र्यांचे संकेत

हरीश रावत यांनी काँग्रेसची AICC समिती ही बीसीसीआय (BCCI) सारखी आहे ती मालक आहे. पक्षाचे जे प्रभारी आहेत ते प्रशिक्षकासारखे आहेत मात्र यात कर्णधाराला (मुख्यमंत्री) देखील एक वेगळे स्थान आहे. या तिघांच्यात एक विश्वास आणि समजुदारपणाचे नाते असले पाहिजे. जर एकमेकांना विरोध करत गेलो तर सामना गमावून बसू. मी जे काही बोललो ते जिंकण्यासाठीच बोललो. कधी कधी आपले दुःख बोलून दाखवणे पक्षाच्याच हिताचे ठरते. अशी वक्तव्ये केली.

हेही वाचा: ओमिक्रॉनचे 50% रुग्ण व्हॅक्सिनेटेड, संसर्ग रोखण्यासाठी मास्कची भूमिका महत्वाची

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत (Harish Rawat) पुढे म्हणाला की, 'कदम - कदम मिलाए जा काँग्रेस के गीत गाए जा हे मी आधीही म्हणत होतोच. मात्र आता मी फक्त याबरोबर थोडासा ढोलही वाजवला. निवडणूक जिंकण्यासाठी आपल्या रणनितीत सुधारणा करणे गरजेचे आहे.'

हरीश रावात (Harish Rawat) यांनी कधी कधी जिंकण्यासाठी दुःख व्यक्त करणे गरजेचे असल्याचे विधान केले. ते म्हणाले, 'मी जे काही म्हणालो ते सामना जिंकण्यासाठी म्हणालो. राजकारणात अनेक गोष्टी होत असतात. काही जण म्हणतात की मी हे राजकीय तडजोडीसाठी करत आहे. कधी कधी आपले दुःख व्यक्त करणे गरजेचे असते. मला असे वाटते की याने पक्षाला फायदाच होईल.'

Web Title: Uttarakhand Former Cm Harish Rawat Compare Congress To Bcci

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top