
डेहराडून : उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धाम येथील माना गावात शुक्रवारी सकाळी सव्वासातच्या दरम्यान हिमस्खलन होऊन सीमा रस्ते संघटनेचे (बीआरओ) रस्त्याच्या कामावरील २५ कामगार अडकले आहेत. माना ते घस्तोली यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) कामगारांच्या छावणीजवळ हे हिमस्खलन झाले. यानंतर तातडीने बचावकार्य सुरू केल्याने ५७ कामगारांपैकी ३२ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.