

Old Vehicle Scrapped New Purchase Tax Benefit
ESakal
उत्तराखंड सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे वाहन मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता जर एखाद्या व्यक्तीने त्यांचे जुने वाहन स्क्रॅप केले आणि त्याच श्रेणीचे नवीन वाहन खरेदी केले तर त्यांना मोटार वाहन करात मोठी सूट मिळेल. ही सूट १५ टक्के ते ५० टक्के असू शकते. पर्यावरण संरक्षण आणि रस्त्यांवरून जुनी, प्रदूषणकारी वाहने काढून टाकण्याच्या दिशेने हे सरकारचे पाऊल मानले जाते.