esakal | बद्रीनाथ-केदारनाथाचं दर्शन यंदाही नाही, उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रा केली स्थगित

बोलून बातमी शोधा

बद्रीनाथ-केदारनाथाचं दर्शन यंदाही नाही
बद्रीनाथ-केदारनाथाचं दर्शन यंदाही नाही
sakal_logo
By
नामदेव कुंभार

देशात दिवसागणिक कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दुसऱ्या लाटेमुळे दररोज साडेतीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. तर तीन हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहून उत्तराखंड सरकारनं चार धाम यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी गुरुवारी चार धाम यात्रा स्थगित करण्यात आल्याची घोषणा केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुले यंदाही केदारनाथ आणि बद्रीनाथाचं दर्शन होणार आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पाहून चार धाम यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त पुजारी तेथे पुजा करतील. संपूर्ण देशासाठी चार धाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या एका उच्चस्थरिय बैठकीत चार धाम यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. चार धाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. मात्र, रितीरिवाजाप्रमाणे येथे दररोज पूजा-अर्चना होईल. मंदिरातील पुजारी नियमांप्रमाणे सर्व विधी करतील.