esakal | उत्तराखंडच्या राज्यपाल बेबीराणी मौर्य यांचा राजीनामा
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तराखंडच्या राज्यपाल बेबीराणी मौर्य यांचा राजीनामा

उत्तराखंडच्या राज्यपाल बेबीराणी मौर्य यांचा राजीनामा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डेहराडून/लखनौ (पीटीआय) : उत्तराखंडच्या राज्यपाल बेबीराणी मौर्य यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या शक्यतेने राजीनामा दिला असावा, अशी चर्चा आहे.

राज्यपाल बेबीराणी मौर्य यांच्या राजीनाम्याने उत्तर प्रदेशातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. कारण आजच त्यांनी राजीनामा दिला आणि आजच भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी आणि सह प्रभारीची नियुक्ती केली. यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून धर्मेंद्र प्रधान यांना नेमले आहे. बेबीराणी मौर्य यांनी उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून गेल्या २६ ऑगस्टला तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली होती. उत्तर प्रदेश भाजपमध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. तसेच आता उत्तराखंडच्या राज्यपालपदी कोणाची नेमणूक होणार, यावरूनही चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा: कोरोनानं झालेल्या मृत्यूंसाठी SCनं नाकारली नुकसान भरपाई; म्हटलं...

मावळत्या राज्यपाल बेबीराणी मौर्य यांनी तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला होता. त्यांनी राज्यात महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या मुद्द्यावर भर दिला. त्यांच्या मते, उत्तराखंडच्या महिला मेहनती आणि कष्टाळू आहेत. महिलांचे सक्षमीकरण हे राजभवनाच्या सहकार्यातून आणखी होऊ शकते आणि पुढेही प्रयत्न केले जातील. आग्रा येथील रहिवासी बेबीराणी मौर्य या उत्तराखंडच्या दुसऱ्या महिला राज्यपाल होत्या. त्यापूर्वी मार्गारेट अल्वा यांनी उत्तराखंडचे राज्यपालपद सांभाळले होते.

loading image
go to top