सुनेला 'स्ट्राइक' देण्याच्या प्रयत्नात सासऱ्याच्या मंत्रीपदाची 'विकेट'

सुनेला 'स्ट्राइक' देण्याच्या प्रयत्नात सासऱ्याच्या मंत्रीपदाची 'विकेट'
Summary

भाजपने पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर मंत्री रावत यांच्या सुनेची चर्चा सध्या सुरु आहे. मिस इंडियाच्या स्पर्धेत ती पाचव्या स्थानी राहिली होती.

नवी दिल्ली - उत्तराखंडच्या राजकारणात हरक सिंह रावत (Harak Singh Rawat) यांच्यावर भाजपने (BJP) केलेल्या कारवाईमुळे उलट सुलट चर्चा रंगली आहे. आता भाजप आणि हरक सिंह रावत यांच्या आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काँग्रेसशी (Congress) जवळीक वाढल्यानं पक्षाने हरक सिंह रावत यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे हरक सिंह रावत यांनी आपल्याशी याबाबत एकदाही न बोलता हा निर्णय घेतला गेल्याचं म्हणत मी काँग्रेसमध्ये जाणार नाही असंही स्पष्ट केलं आहे. दरम्यान, भाजपने केलेल्या कारवाईनंतर त्यांना अश्रूही अनावर झाले. ते म्हणाले की, मी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलो नसतो तर चार वर्षांपूर्वीच भाजपचा राजीनामा दिला असता. मला मंत्रीपदात रस नाही. मला फक्त काम करायचं आहे.

एका बाजुला आपण काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचं हरक रावत म्हणतायत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, रावत यांच्याकडून पक्षावर दबाव टाकण्यासाठी प्रयत्न केला जात होता. यामध्ये ते कुटुंबातील सदस्यांसाठी तिकिटाची मागणी करत होते. मात्र आमची धोरणे वेगळी आहेत आणि निवडणुकीत कुटुंबातील एकाच सदस्याला तिकिट दिलं जाऊ शकतं असंही ते म्हणाले.

हरक रावत यांनी त्यांची सून अनुकृती रावत यांच्यासाठी तिकिट मागितल्याचं सांगितलं जात आहे. अनुकृतीचे आणि हरक सिंह रावत यांचा मुलगा तुषित यांचे २०१८ मध्ये लग्न झाले. दोन्ही घरचे आधीपासूनच कौटुंबिक संबंध होते. दरम्यान, हरक सिंह रावत यांच्या लँसडाऊनमधील प्रचाराची धुरा अनुकृती सांभाळत होती.

सुनेला 'स्ट्राइक' देण्याच्या प्रयत्नात सासऱ्याच्या मंत्रीपदाची 'विकेट'
'माझं काम आणि राजकारण एकत्र करू नका'; काँग्रेस उमेदवार अर्चना संतापल्या

अनुकृती गुसाई रावत ही एक मॉडेल आणि टीव्ही अँकर होती. १९९४ मध्ये जन्मलेल्या अनुकृतीने २०१३ मध्ये मिस इंडिया दिल्लीचं विजेतेपद पटकावलं होतं. तर मिस इंडिया स्पर्धेत पाचव्या स्थानी राहिली होती. याशिवाय २०१३ मध्ये ब्राइड ऑफ द वर्ल्ड इंडियाचं विजेतेपद पटकावलं. तर २०१४ मध्ये मिस इंडिया पॅसिफिक वर्ल्ड आणि २०१७ मध्ये मिस इंडिया ग्रँड इंटरनॅशनलमध्ये भारताकडून सहभागी झाली होती. महिलांच्या सबलीकरणासाठी स्थापन केलेल्या एका संस्थेची ती अध्यक्ष आहे.

अनुकृती यांनीही आपण लँसडाऊनमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असल्याचं म्हटलं आहे. तसंच इथल्या जनतेलासुद्धा मीच लढावं असं वाटत असल्याचंसुद्धा त्या म्हणतात. पक्षाने तिकिट दिलं नाही दिलं तरी मी निवडणूक इथूनच लढणार आहे. आता कोणता पक्ष मला तिकिट देतो पाहू, भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांसाठी पर्याय उपलब्ध असल्याचं अनुकृती यांनी म्हटलं आहे.

सुनेला 'स्ट्राइक' देण्याच्या प्रयत्नात सासऱ्याच्या मंत्रीपदाची 'विकेट'
भाजपने पक्षातून तर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हाकललं

हरक सिंह रावत हे कोटद्वार विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. तर लँसडाऊनमध्ये भाजपचे दिलीप रावत हे आमदार आहेत. आता तरुण पिढी जर नेतृत्वासाठी पुढे येत असेल तर त्यापेक्षा चांगलं काय असू शकतं असंही हरक रावत म्हणाले होते. आता पक्षाने त्यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर पुढे काय करणार हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. मात्र अनुकृती यांनी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरणारच असं स्पष्ट सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com