
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हरीद्वारमध्ये झालेल्या जमिन घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. दोन आयएएस, एक पीसीएस अधिकारी यांच्यासह सात अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. याआधी तीन अधिकाऱ्यांना पूर्वीच निलंबित केले आहे, तर दोन अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी या खटल्याच्या तपासणी तसेच जमीन खरेदीचे- विक्री करार रद्द करून, व्यवहारासाठी वापरलेले पैसे परत घेण्याच्या सूचनाही करण्यात आली आहे.