
उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्री मंदिराला जाणारे हेलिकॉप्टर आज सकाळी पावणेनऊच्या सुमारास कोसळून झालेल्या अपघातात चालकासह सहा जण ठार झाले. एक जण गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरूंचाही समावेश आहे. खासगी कंपनीच्या या हेलिकॉप्टरने एकूण सात यात्रेकरू गंगोत्रीला जात होते.