

Court Rejects Assumptions Without Scientific Proof
esakal
उत्तराखंड उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने स्पष्ट केले की, केवळ चालकाच्या तोंडातून दारुचा वास येत असल्यामुळेच त्याने दारु पिऊन वाहन चालवले होते, असा निष्कर्ष काढता येणार नाही. 'मोटर वाहन कायदा, १९८८' अन्वये विहित केलेल्या मर्यादेपेक्षा शरीरातील मद्याचे प्रमाण अधिक होते, हे रक्त चाचणी किंवा 'ब्रेथ ॲनालायझर' चाचणीद्वारे सिद्ध होणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने नमूद केले. अशा वैज्ञानिक चाचणीच्या अभावी, केवळ दारुच्या वासाच्या आधारे मद्यपान करून वाहन चालवल्याचा किंवा बीएनएस (BNS) च्या कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल करता येणार नाही.