Uttarakhand Landslide : धौलीगंगा प्रकल्पात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले, बचावकार्य सुरू
Dhauliganga Project : उत्तराखंडमधील धौलीगंगा जलविद्युत प्रकल्पात भूस्खलनामुळे बोगदा बंद झाल्याने १९ कामगार अडकले असून, सर्व कामगार सुरक्षित असून बचावकार्य सुरू आहे.
पिठोरागड : भूस्खलनामुळे उत्तराखंडातील धौलीगंगा ऊर्जाप्रकल्पाच्या बोगद्यामध्ये १९ कामगार अडकले आहेत. ‘नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड’चा (एनएचपीसी) हा प्रकल्प आहे.