उत्तराखंडमधील मदरशांची शुक्रवारची सुट्टी रद्द? आता रविवारची साप्ताहिक सुट्टी लागू करण्याचा निर्णय

Uttarakhand Madrasa Weekly Holiday: उत्तराखंडमधील मदरशांची शुक्रवारची साप्ताहिक सुट्टी रद्द करून रविवारची सुट्टी लागू करण्याच्या निर्णयाची चर्चा सुरू आहे. या बदलामुळे मदरशांच्या साप्ताहिक वेळापत्रकात काय बदल होणार, याकडे लक्ष लागले आहे.
_weekly holiday for madrasas in Uttarakhand from Friday to Sunday

weekly holiday for madrasas in Uttarakhand from Friday to Sunday

sakal

Updated on: 

उत्तराखंडमधील शाळा म्हणून मान्यता मिळालेल्या मदरशांमध्ये आता शुक्रवारऐवजी रविवारी साप्ताहिक सुट्टी असणार आहे. राज्यातील शैक्षणिक संस्थांसाठी एकसमान नियम लागू करण्याच्या उद्देशाने उत्तराखंड अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरणाने हा बदल केला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये समान नियम असण्याची भूमिका मांडली आहे. या निर्णयावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, काही संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com