उत्तराखंडमध्ये भाजपला डबल दणका; मंत्र्यासह आमदाराचा राजीनामा?

मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून ते बाहेर गेल्याचंही सांगण्यात येत आहे.
Harak Singh Rawat
Harak Singh RawatSakal

Uttarakhand News : उत्तराखंडमध्ये निवडणुकीआधी भाजपला (BJP)डबल धक्का बसला आहे. अतंर्गत कलहातून सरकारमधील कॅबिनेट मंत्री हरक सिंह रावत (Harak Sinh Rawat) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं राज्याच्या राजकारणात (Politics) मोठा भूकंप झाला आहे. मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून ते बाहेर गेल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यांच्या विभागाच्या योजना जाणीवपूर्वक अडवल्या जात असल्याचं त्यांनी म्हटलं.

आमदार उमेश शर्मा काऊ यांनीही राजीनामा दिल्याची चर्चा आहे. मात्र याबाबतच अद्याप माहिती मिलालेली नाही. दुसरीकडे हरक सिंह रावत यांनी त्यांच्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. तर उत्तराखंडचे भाजप अध्यक्ष मदन कौशिक यांनी मात्र राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

Harak Singh Rawat
मुंबई : पोलिसांच्याच घरी चोरी, दुपारच्या वेळी चोरले दोन महागडे मोबाईल

रावत यांनी आरोप केला की, उत्तराखंड सरकार कोटद्वारमध्ये मेडिकल कॉलेजला मंजुरी देण्याच्या कामात अडथळे आणत आहे. रावत यासाठी सातत्यानं सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. रावत यांनी एका खासगी चॅनेलशी बोलताना हरक रावत यांनी सांगितलं की, ५ वर्षांपासून मेडिकल कॉलेज माझ्या मतदारसंघात मागत होतो. पण या लोकांनी मला भिकारी बनवलं. हरक रावत हे त्यांच्या भावनाही आवरू शकले नाहीत. त्यांचे डोळे पाण्याने भरले होते, त्यांना हुंदका अनावर झाला.

हरक सिंह रावत यांनी अनेकदा बंडखोरी केली आहे. याआदी २०१६ मध्ये काँग्रेसला रामराम करून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र भाजपमध्ये आल्यानंतरही त्यांनी अनेकवेळा नेतृत्वाविरोधात आवाज उठवला.

Harak Singh Rawat
बेळगाव : ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून दहा वर्षाचा बालक ठार

आता ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०१६ मध्ये त्यांनी उत्तराखंडमध्ये हरीश रावत यांच्या सरकारविरोधात आवाज उठवला होता. यामुळे सरकार कोसळण्याची वेळ आली होती आणि प्रकरण सर्वोच्च न्य़ायालयापर्यंत गेले होते. त्यामुळे आता पुन्हा हरक सिंह रावत हे काँग्रेसमध्ये आल्यास हरीश रावत यांच्यासाठी कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com