Uttarakhand News : मूळ गावे दत्तक घेणाऱ्या ३० प्रवासी उत्तराखंडींचा गौरव; गुंतवणूक, पर्यटन आणि शिक्षणात योगदान देण्याचे शासनाचे आवाहन

Uttarakhand Pravasi Sammelan 2026 : मूळ गावांच्या विकासासाठी ३० प्रवासी उत्तराखंडी नागरिकांनी गावे दत्तक घेतली; महाराष्ट्रातील ९ प्रतिनिधींसह ३०१ जणांचा सहभाग, कृषी, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन क्षेत्रांत गुंतवणुकीचे आवाहन.
Delegates attend the Pravasi Uttarakhandi Sammelan 2026 at Doon University in Dehradun

Delegates attend the Pravasi Uttarakhandi Sammelan 2026 at Doon University in Dehradun

esakal

Updated on: 

डेहराडून : उत्तराखंडमधील मूळ गावांशी पुन्हा नाळ जोडण्यासाठी आणि राज्याच्या विकासात योगदान देण्यासाठी देशाच्या विविध भागांत स्थायिक झालेले उत्तराखंडी नागरिक एकत्र आले. डेहराडून येथील दून विद्यापीठात आयोजित तृतीय प्रवासी उत्तराखंडी संमेलन २०२६ मध्ये महाराष्ट्रातील ९ प्रतिनिधींसह देशभरातील २८२ प्रवासी उत्तराखंडी आणि मूळ गावी परतलेले १९ नागरिक सहभागी झाले. या संमेलनात एकूण ३०१ प्रतिनिधींची उपस्थिती होती.

Loading content, please wait...