Uttarakhand
esakal
Uttarakhand : बिल दाखवा – बक्षिस मिळवा! राज्य सरकारची भन्नाट योजना;मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला लकी ड्रॉ, बक्षिसांचा पडला पाऊस
उत्तराखंड सरकार नेहमी जनतेसाठी काही ना काही योजना राबवत आहे. आता सरकारने राज्य कर विभागाचे बिल दाखवा – बक्षिस मिळवा योजना जाहीर केली होती. या योजने अंतर्गत नोंदणीकृत 87 हजार ग्राहकांचा मेगा ड्रॉ करण्यात येणार आहे. आज दिवशी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थितीत मेगा ड्रॉ काढून विजेत्यांची घोषणा केली.
या मेगा ड्रॉमध्ये एकूण 1888 बक्षिसे देण्यात आली. पहिल्या बक्षिसात दोन इलेक्ट्रिक कार देण्यात आल्या. जीएसटी बिलासाठी ग्राहकांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्य सरकारने 1 सप्टेंबर 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत ही योजना सुरू केली होती.
ग्राहकांचा उत्साह पाहून सरकारने ही योजना 31 मार्च 2024 पर्यंत वाढवली. या योजनेत वस्तू खरेदीवर जीएसटी बिल अपलोड केल्यावर दर महिन्याला लकी ड्रॉ काढण्यात आला, ज्यामध्ये 1500 विजेत्यांना मोबाइल, स्मार्ट वॉच आणि इयरबड्स देण्यात आले.

