Jungle Safari: वाघ-हत्तींच्या सफारीपलीकडे उत्तराखंडची नवी झेप; आता पर्यटकांना दाखवणार ‘हिमालयीन घोस्ट

Uttarakhand Plans Snow Leopard Tourism Model: उत्तराखंडमध्ये आता हिमबिबट्याचे दर्शन; पर्यावरणपूरक वन्यजीव पर्यटन मॉडेल विकसित करण्याची तयारी
uttarakhand snow leopard tourism.

uttarakhand snow leopard tourism.

esakal

Updated on: 

उत्तराखंड : उत्तराखंड म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते वाघ, हत्ती आणि जंगल सफारी. आता या पारंपरिक वन्यजीव पर्यटनाला हिमालयातील आणखी एका दुर्मीळ प्राण्याची जोड मिळण्याची शक्यता आहे. हिमबिबट्याचे (Snow Leopard) नियंत्रित आणि पर्यावरणपूरक दर्शन घडवून आणण्यासाठी उत्तराखंडमध्ये विशेष वन्यजीव पर्यटन मॉडेल विकसित करण्याची तयारी सुरू आहे.

राज्याच्या पर्यटन आणि वन विभागाकडून यासाठी उच्च हिमालयातील संभाव्य भागांचा अभ्यास केला जात आहे. गंगोत्री राष्ट्रीय उद्यान, हर्षिल आणि अस्कोट वन्यजीव अभयारण्य या भागांवर विशेष लक्ष दिले जात आहे. गंगोत्री राष्ट्रीय उद्यानात हिमबिबट्यासह अनेक दुर्मीळ हिमालयीन प्रजातींचा अधिवास असल्याची माहिती उत्तराखंड पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर आहे. अस्कोट वन्यजीव अभयारण्यालाही हिमबिबट्यांसाठी महत्त्वाचे क्षेत्र म्हणून जिल्हा प्रशासनाने नमूद केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com