

Sakal
उत्तराखंड : उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी (Snowfall) झाल्यानंतर थंडीने टोक गाठले आहे. पहाडी (पर्वतीय) भागांमध्ये सकाळ-संध्याकाळ दंव (पाला) पडत आहे, तर मैदानी भागात धुके (Fog) पसरले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज बुधवारी आकाश पूर्णपणे कोरडे राहील. मात्र, उच्च हिमालयीन भागांमध्ये रात्रीचे तापमान मायनस ६°C पर्यंत खाली जात आहे.