
Uniform Civil Code:
देशात सर्वात आधी समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय उत्तराखंडने घेतला होता. हा कायदा आजपासून लागू करण्यात आला आहे. राज्यात समान नागरी कायदा लागू करत आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.
2000 मध्ये उत्तराखंड राज्याची स्थापना करण्यात आली. यानंतर 2024 हे वर्ष राज्यासाठी अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरलं. याच वर्षात उत्तराखंड सरकारने समान नागरी कायदा मंजूर केला. असा निर्णय घेणारं उत्तराखंड हे देशातलं पहिलंच राज्य ठरलं. हा कायदा आजपासून राज्यात लागू झाला आहे.