Uttarakhand: पर्यटनाचा महाविक्रम! उत्तराखंडमध्ये पहिल्यांदाच ६ कोटींहून अधिक पर्यटकांची गर्दी; 'या' शहराने मोडले सर्व रेकॉर्ड

Haridwar tourist count 2025 : उत्तराखंडमध्ये २०२५ मध्ये पर्यटकांची संख्या ६ कोटींहून अधिक झाली; हरिद्वारने ३.४२ कोटी पर्यटकांसह अव्वल स्थान पटकावले. हिवाळी-उन्हाळी पर्यटन धोरणांनी स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा दिला, रोजगाराच्या लाखो संधी निर्माण झाल्या.
Uttarakhand winter tourism 2025

Uttarakhand winter tourism 2025

sakal

Updated on

उत्तराखंड : उत्तराखंडच्या पर्यटन क्षेत्राने २०२५ या वर्षात एक नवा इतिहास रचला आहे. राज्य निर्मितीनंतर पहिल्यांदाच पर्यटकांच्या संख्येने ६ कोटींचा टप्पा ओलांडला असून, 'हरिद्वार' हे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण ठरले आहे.

देवभूमी उत्तराखंडमध्ये २०२५ मध्ये तब्बल ६,०३,२१,१९४ पर्यटकांनी भेट दिली आहे. यामध्ये १.९२ लाख परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, हरिद्वारने एकट्याने ३.४२ कोटी पर्यटकांना आकर्षित करत अव्वल स्थान पटकावले आहे. राज्याची राजधानी डेहराडून ६७.३५ लाख पर्यटकांसह दुसऱ्या, तर टिहरी ५३.२९ लाख पर्यटकांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Uttarakhand Tourism
Bhishacha Kada tourist safety Ratnagiri
Why did tourists clash at Sawantwadi Waterfall?
8 of India’s Top 10 Tourist Attractions Are Pilgrimage Destinations, Says Latest Data
Marathi News Esakal
www.esakal.com