Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत ढगफुटीमुळे पूर, मलब्याने घरे उद्ध्वस्त! अनेक लोक अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू...

उत्तरकाशीच्या धराली गावात ढगफुटीमुळे पूर आणि मलब्याने अनेक घरे उद्ध्वस्त. एनडीआरएफ, एसडीआरएफ बचावकार्यात व्यस्त. प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा.
cloudburst in Uttarkashi
cloudburst in Uttarkashiesakal
Updated on

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात मंगळवारी ढगफुटीमुळे मोठी आपत्ती घडली. गंगोत्री धाम आणि मुखवा येथील धराली गावाजवळ खीरगंगा नाल्यात ढगफुटी झाल्याने नाला वाहू लागला. यामुळे पाणी आणि मलबा डोंगरातून खालच्या भागात वेगाने वाहत आला, ज्यामुळे अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या घटनेने स्थानिक लोकांमध्ये प्रचंड भीती आणि दहशत पसरली आहे. अनेक लोक मलब्याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com