

Uttarkashi Fire Tragedy Destroys Homes of 33 Families but Timely Efforts by Villagers Save 13 Houses from the Blaze
esakal
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील मोरी तहसीलमधील दुर्गम पावनी गावात मंगळवारी लागलेल्या भीषण आगीत ३३ निवासी घरे पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा पशुहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आगीत ग्रामपंचायत इमारत आणि प्राथमिक शाळेचेही मोठे नुकसान झाले. अग्निशमन दल आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे शेजारील १३ घरे वाचवण्यात यश आले.