esakal | Uttarpradesh: शेतकऱ्यांप्रमाणे घटनाही चिरडतील : अखिलेश यादव
sakal

बोलून बातमी शोधा

अखिलेश यादव

शेतकऱ्यांप्रमाणे घटनाही चिरडतील : अखिलेश यादव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कानपूर : उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांप्रमाणे ते घटनाही चिरडून टाकतील, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव यांनी आगामी विधानसभा निवडणूकीसाठी मंगळवारी रणशिंग फुंकले.

रथयात्रेच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ करण्यापूर्वी अखिलेश यांनी पिता तसेच माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यांचे आशीर्वाद घेतले. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाच्या संदर्भानेच त्यांनी भाषण केले. ते म्हणाले की, भाजपला पुन्हा सत्ता मिळाल्यास घटना चिरडण्याची त्यांची जय्यत तयारी झालेली असेल. त्यामुळेच आमचा समाजवादी विजय रथ जनतेपर्यंत जाईल आणि भाजपला सत्तेवरून घालवेल. शेतकऱ्यांना हक्क आणि सन्मान पुन्हा मिळावा म्हणून हा रथ सतत फिरत राहील. कार्यकर्त्यांनी लोकांकडे जावे आणि त्यांचा पाठिंबा मिळवावा.

हेही वाचा: औरंगाबादेत बंधाऱ्यात कार बुडाली,एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

मुलायम यांनी रथयात्रेचा प्रारंभ कानपूरमधून केल्याचे नमूद करून त्यांनी सांगितले की, आमचा पक्ष विकासासाठी काम करतो. कानपूर हे मोठे औद्योगिक शहर आहे, पण आज व्यापारी संस्था बंद पडल्या आहेत. हे शहर रोजगार देण्याबरोबरच देशाची अर्थव्यवस्थाही सुधारू शकते. आमचा पक्ष त्यासाठी कार्य करेल. लोक पाठिंबा देतील आणि सपाचे सरकार बहुमताने स्थापन होईल असा विश्वास वाटतो.

खजांचीला बहुमान

रथयात्रेला निशाण दाखविण्याचा बहुमान खजांची नामक चिमुकल्यास देण्यात आला. २०१६ मध्ये नोटाबंदीच्या घोषणेनंतर एटीएममधून पैसे काढण्यासाठी रांगेत थांबलेल्या सर्वेशा देवी यांना प्रसूतीच्या कळा असह्य झाल्या होत्या. त्यांनी जन्म दिलेल्या मुलाचे नाव खजांची असे ठेवण्यात आले आहे.

loading image
go to top