कहरच केला...: बनावट आधार कार्ड दाखवून 99 गुन्हेगारांना जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jail

कहरच केला...: बनावट आधार कार्ड दाखवून 99 गुन्हेगारांना जामीन

फिरोजाबाद : उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये यावर्षी खून, दरोडा आणि चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या किमान 99 जणांना त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांनी बनावट आधार कार्डद्वारे जामीन मिळवून दिल्याची घटना घडली आहे. याशिवाय आरोपींना जामीनासाठी एकाच जमिनीचे कागदपत्र वापरण्यात आले आहेत. पोलिसांच्या तपासातून ही माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून यासारखे अजून प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.

(99 Criminal Bail on Fake Adhaar Card)

हेही वाचा: मुंबई | सांताक्रुझमध्ये LIC इमारतीला भीषण आग, अग्नीशमन दल घटनास्थळी

याप्रकरणी फिरोजाबादचे एसएसपी यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. गुन्हेगारांचे नातेवाईक आणि मित्र बनावट आधार कार्ड आणि जमिनीचे कागदपत्र दाखवून जामीन मिळवतात असं तक्रारीत म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केल्यावर 99 जणांची नावे समोर आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं एसएसपी आशिष तिवारी यांनी सांगितलं आहे.

तपासातून समोर आलेल्या गुन्हेगारांवर परत गुन्हे दाखल करण्यात येणार असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. तसेच फसवणूक करुन गुन्हेगाराला जामीन मिळवून देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर गुन्हेगारांच्या जामीनासाठी आता पोलिस ठाणे आणि तहसील स्तरावर जामीनदारांची सर्व कागदपत्रे प्राधान्याने तपासली जाणार आहेत, जेणेकरून यानंतर जामीनदारांना बनावट जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असं ते म्हणाले.

हेही वाचा: पित्यानेच केला लेकीवर बलात्कार; नैराश्यातून तीने घेतला गळफास

किती प्रकरणे?

बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळण्याची सर्वाधिक प्रकरणे शिकोहाबादमध्ये समोर आली असून, तेथे अशाच प्रकारे १५ गुन्हेगारांना जामीन मिळाला आहे. याशिवाय सिरसागंजमध्ये 11, दक्षिण पोलिस ठाण्यात 9, तुंडला आणि रसूलपूरमध्ये 7, रामगढ आणि माखनपूरमध्ये 6, पाचोखरा आणि खैरगढमध्ये 5, मतसेना, बसई मोहम्मदपूर, नसीपूर, जसराना आणि लाइनपार 4, नागला खंगार 3 आणि नागला उत्तर येथे एक प्रकरण समोर आले आहे.

Web Title: Uttarpradesh Criminal Bail Fraud Adhaar Card Friend

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top