
Mayawati
sakal
लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या (बसप) अध्यक्षा मायावती या सुमारे दहा वर्षांनंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. मायावती यांनी गुरुवारी लखनौ येथे जाहीर सभेत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. बसप संस्थापक कांशीराम यांच्या पुण्यतिथी निमित्त ही सभा आयोजित करण्यात आली होती, या सभेला राज्यभरातून लाखो कार्यकर्ते उपस्थित होते.