
व्ही. के. शशिकला या कोरोनातून मुक्त झाल्या असून त्यांना काल रुग्णालयातून सोडून देण्यात आले. भ्रष्टाचार प्रकरणात चार वर्षांची शिक्षा भोगून संपल्यावर काही दिवसांपूर्वीच शशिकला यांना तुरुंग प्रशासनाने मुक्त केले होते.
बंगळूर - अण्णा द्रमुकमधून हकालपट्टी झालेल्या नेत्या व्ही. के. शशिकला या कोरोनातून मुक्त झाल्या असून त्यांना काल रुग्णालयातून सोडून देण्यात आले. भ्रष्टाचार प्रकरणात चार वर्षांची शिक्षा भोगून संपल्यावर काही दिवसांपूर्वीच शशिकला यांना तुरुंग प्रशासनाने मुक्त केले होते.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मात्र, कोरोना उपचारांमुळे त्या काही काळ रुग्णालयातच होत्या. त्या बाहेर येताच हजारो समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. तमिळनाडूमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शशिकला यांची सुटका झाली आहे.