15 ते 18 वयोगटासाठी लसीकरण नोंदणी सुरू, जाणून घ्या प्रक्रिया | Children Vaccine Registration | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine for child  child vaccination

15 ते 18 वयोगटासाठी लसीकरण नोंदणी सुरू, जाणून घ्या प्रक्रिया

नवीन वर्षात केंद्र सरकारने 15 ते 18 वर्षातील मुलांसाठी लसीकरणाचे भेट दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला शनिवारी म्हणजे एक जानेवारी 2022 ला कोविन पोर्टलवर किंवा अॅपवर 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी नोंदणी प्रक्रिया सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. सोमवारुपासून त्यांचे लसीकरण सुरू होणार आहे.

पंतप्रधान मोदी यांनी 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु करण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे जर मुलांकडे आधार कार्ड नसेल तरीही ते फक्त १०वीचे मार्कशीट आणि आयडी कार्ड वापरून नोंदणी करून, लसीकरणासाठी स्लॉट बुक करू शकतात.

दिल्लीत शाळेमध्ये लसीकरण केंद्र सुरू करत आहे

देशाची राजधानी दिल्लीमध्ये 15-18 वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी तयारी जोरात सुरू केली आहे. माहितनुसार, या कॅटगरीमध्ये जवळपास १० लाख मुलांचे लसीकरण होणार आहे. एलएनजेपी हॉस्पिटल आणि दिल्लीमध्ये इतर चिकित्सा केंद्राच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, मुलांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पायाभूत सुविधा तयार आहेत. जास्त क्षमता असलेल्या शाळा आणि शैक्षणित संस्थांन कोरोना प्रतिबंधक लसीकरण सेंटर म्हणून वापरणार आहे आणि तिथे व्यवस्था करण्यात येत आहे.

लवकर लसीकरण करा, डॉक्टरांनी केले निवेदन

डॉक्टरांना या वयोगटातील मुलांचे लवकरात लवकर लसीकरण सुरू करण्याचा आग्रह पालकांना केला आहे, जेणेकरून कोरोन व्हायरस महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्यापासून त्यांना सुरक्षित ठेवता येईल. मेडिकल स्ट्रॅटर्जी एन्ड ऑपरेशन्स, फोर्टिस हेल्थकेअर ग्रुपमध्ये ग्रुप हेड डॉ. विष्णू पाणिग्रही यांनी सांगितले की वायरसचा ओमीक्रॉन व्हेरिअंट लोकांमध्ये संक्रमित होत आहे आणि तो सगळकडे पसरत आहे पण ज्या लोकांनी लसीकरणाचा डोस घेतला आहे ते मोठ्या प्रमाणात एसिप्टोमेटिक आहेत आणि ज्या लोकांचे लसीकरण झाले नाही त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. त्यामुळे लोकांना निवेदण आहे की त्यांना मास्क वापरावा आणि पात्र असल्यास लवकरात लवकर लसीकरण करावे.

हेही वाचा: 'आधार' नसेल तरी होणार मुलांचे लसीकरण; लावा ही दोन कागदपत्रं

नोंदणी कशी करावी

  • पालकांनी किंवा पालकांनी प्रथम आरोग्य सेतू अॅप किंवा Cowin.gov.in वर जाऊन स्वतःची नोंदणी करावी. जर त्यांनी आधीच नोंदणी केली असेल तर तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा.

  • नवीन नोंदणीसाठी तुम्हाला ओळखपत्राचा प्रकार, फोन नंबर आणि तुमचे पूर्ण नाव टाकावे लागेल.

  • यानंतर, येथे मुलाचे लिंग आणि वय नमूद करावे लागेल.

  • यानंतर मोबाईल नंबरवर कन्फर्मेशन मेसेज येईल.

  • त्यानंतर तुम्ही तुमच्या क्षेत्राचा पिन कोड टाकून तेथील लसीकरण केंद्रांच्या यादीतून कोणतेही केंद्र निवडू शकता.

  • त्यानंतर तुम्हाला तुमचा लसीकरण स्लॉट त्या केंद्रावर तारीख आणि वेळेसह बुक करावा लागेल.

  • ज्या मुलांना ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा नाही त्यांनी त्यांच्या ओळखपत्रासह लसीकरण केंद्रात जावे आणि तेथे ऑन-साइट लसीचा स्लॉट बुक करावा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :covid vaccination news
loading image
go to top