Vaccination For Children : 'आधार' नसेल तरी होणार मुलांचे लसीकरण; लावा ही दोन कागदपत्रं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination to Children

'आधार' नसेल तरी होणार मुलांचे लसीकरण; लावा ही दोन कागदपत्रं

Vaccination for children 2022 : देशात १५ ते १८ वर्षाच्या वयोगटातील मुलांना लसीकरणासाठी (Vaccination For Children) ३ जानेवारीला उपक्रम सुरु होणार आहे. प्रौढांप्रमाणे (Adult) लहान मुलांना देखील लसीकरणासाठी (Vaccine) नोंदणी (Registration) करावी लागेल. मुलांचे लसीकरण करण्याची प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरू होईल. मुलांची लसीकरण नोंदणी CoWIN अॅपवर होणार आहे. नॅशनल हेल्थ अॅथॉरिटीचे सीईओ डॉ. आर एस शर्मा यांनी सांगितले की, ''१ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांची लसीकरणासाठी नोंदणी करू शकता.''

डॉ. शर्मा यांना सांगितले की,'' मुलांना लसीकरणासाठी CoWIN मार्फत पहिल्यांदा नोंदणी करावी लागेल. ज्या मुलांकडे आधार कार्ड नाही त्यांच्यासाठी CoWIN अ‍ॅपवर १०वीची मार्कशीट अ‍ॅड करण्याचा पर्याय दिला आहे. त्यासोबत शाळेचा ओखळपत्राचे देखील नोंदणी करावी लागेल. मुल आपल्या आई-वडिलांचा फोन नंबरवरून ही नोंदणी करू शकतात. कारण एका क्रमांकावर एकाच कुटुंबातील ४ लोकांची नोंदणी केली जाऊ शकते. त्यासोबत मुलं आपल्या जवळच्या केद्रांमध्ये जाऊन तिथेच नोंदणीही करू शकतात.''

गेल्या काही दिवासांपासून भारताच्या औषध नियंत्रक जनरलने (DCGI)काही अटीवर १२ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांना भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक लस कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिलेली आहे. Zydus Cadila ने विकसित केलेल्या Zykov-D लसीनंतर 18 वर्षांखालील मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये वापरण्यासाठी नियामक मान्यता मिळवणारी ही दुसरी लस आहे.

ओमीक्रॉनचा धोका पाहता पीएम मोदींनी केली घोषणा

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आणि व्हायरसच्या नवीन व्हेरिअंट ओमीक्रॉनचे देशातील वाढते संक्रमण पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबरला घोषणा केली की, ''पुढील वर्षी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षाखालील मुलांना लसीकरणाचा उपक्रम सुरु केला जाईल. तसेच १० जानेवारीपासून देशामध्ये स्वास्थ्य आणि आरोग्य कर्मचारी, अन्य आजारग्रस्त ६० वर्षांपासून पुढील लोकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खबरदारी म्हणून तिसरा बुस्टर डोस देण्यास सुरूवात केली जाईल. याला बूस्टर डोस ऐवजी खबरदारी (precaution) डोस देखील म्हणतात.

Web Title: No Aadhaar For Vaccine Registration Children Can Get A 10th Mark Sheet Or Id Card

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top