esakal | १२ ते १७ वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित अन् प्रभावी लस, मॉडर्ना कंपनीचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine

१२ ते १७ वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित अन् प्रभावी लस, मॉडर्ना कंपनीचा दावा

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नवी दिल्ली : सध्या जगभरात कोरोनाने (coronavirus) थैमान घातले आहे. ज्येष्ठ आणि तरुणांसोबतच आता लहान मुलांना देखील कोरोनाचा फटका बसतो आहे. तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता एक दिलासादायक बातमी म्हणजे एका विदेशी कंपनीने त्यांची लस लहान मुलांवर प्रभावी असल्याचा दावा केला आहे. मॉडर्ना (pharmaceutical company moderna) या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीची लस १२ ते १७ वयोगटातील मुलांसाठी (vaccine for 12 to 17 years children) सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे कंपनीने सांगितले आहे. (vaccine found safe and effective on 12 to 17 years children says moderna company)

हेही वाचा: corona positive story : एचआरसीटी स्कोअर १८ तर ऑक्सिजन लेव्हल ८२; मग झाला पुनर्जन्म

कंपनीकडून त्यांच्या लशीची ३७३२ जणांवर तिसरी ट्रायल घेण्यात आली. त्यापैकी दोन तृतीयांश जणांना लस देण्यात आली, तर प्रौढांमध्ये ज्याप्रमाणे लस दिल्यानंतर प्रभाव जाणवला तसाच प्रभाव मुलांवर दिसून आल्याचे कंपनीने सांगितले. मुलांवर चाचणी करताना असे दिसून आले की, लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसानंतर लसीचा प्रभाव दिसायला सुरुवात होते. मुलांना दुसरा डोस दिल्यानंतर एकाही मुलांना कोरोना झाला नसल्याचेही कंपनीने सांगितले आहे. तसेच या लसीचे डोकेदुखी, थकवा, सर्दी यासारखे सर्वसाधारण दुष्परिणाम आहेत. ही लस किशोरवयीन मुलांवर अधिक प्रभावी असल्याचे दिसून आले. याबाबतचे सर्व अहवाल आम्ही युएस अन्न व औषध प्रशासनाकडे सादर करणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टेंफी बान्सेल यांनी सांगितले.

अमेरिकेमध्ये जर या लशीला परवानगी मिळाली, तर १२ ते १७ वयोगटातील मुलांसाठी हा दुसरा पर्याय ठरणार आहे. कारण यापूर्वी अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांनी फायझर कंपनीने तयार केलेल्या लसीच्या १२ ते १७ वयोगटातील मुलांसाठी वापरण्याची परवानगी दिली आहे.