esakal | लस घ्या अन् बाहुबली व्हा, पंतप्रधान मोदींचं आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

लस घ्या अन् बाहुबली व्हा, पंतप्रधान मोदींचं आवाहन

लस घ्या अन् बाहुबली व्हा, पंतप्रधान मोदींचं आवाहन

sakal_logo
By
नामदेव कुंभार

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून (ता.१९) प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी संसदेबाहेरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सर्वांनी करोना नियमांचं पालन करावं, असं आवाहन नेत्यांना केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना लस घेण्याचं आव्हान केलं. ते म्हणाले की, 'लस दंडावर घेतली जाते. त्यामुळेच कोरोना विरोधातील लढ्यात लस घेतलेला बाहुबली बनतो. 40 कोटींपेक्षा जास्त लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे. कोरोनाच्या लढ्यात सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. कोरोनाविरोधात बाहुबली होऊन लढा देऊयात.'

राजधानी दिल्लीमध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे संसदेत पोहचण्यासाठी सर्वच नेत्यांना छत्रीचा आधार घ्यावा लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्व:त छत्री घेऊन संसदेत पोहचले होते. यावेळी मोदी म्हणाले की, 'आशा आहे की सर्वांनी एकतरी कोरोना लसीचा डोस घेतला असेल. पण तरिही सर्वांनी कोरोना नियमांचं पालन करावं. संसदेत उपस्थित असणाऱ्या सर्वांना विनंती करतो की करोना नियमांचं पालन करावं.'

हेही वाचा: कोणी कोणाशीही हातमिळवणी केली तरी शिवसेना सक्षमच!

पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्व पक्षांच्या गटनेत्यांसोबत चर्चा केली. कठीण प्रश्न विचारा मात्र शांततेत चर्चा करा, असा आवाहन मोदी यांनी विरोधकांना केलं आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या अधिवेशनात एकूण २३ विधेयके सरकारकडून प्रस्तावित आहेत. त्यापैकी ६ जुनी तर १७ नवी विधेयके आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी सर्वपक्षीय बैठक झाली. ३३ पक्षांच्या ४० पेक्षा अधिक नेत्यांनी या बैठकीला उपस्थिती लावली. पावसाळी अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांना महत्त्व दिलं जावं, याबाबत बैठकीत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की सर्व नेत्यांचे आणि विरोधी पक्षांच्या सूचना महत्त्वाच्या आहेत.

loading image