

Vadodara Medical Admission Fraud Case
esakal
गुजरातमधील वडोदरा येथे मुलाला खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून भाजप नेत्याची तब्बल ५५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'मॅनेजमेंट कोटा'मधून मेडिकल प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देत २०१९ मध्ये ही रक्कम घेतल्याचा आरोप आहे. मात्र, प्रवेश मिळाला नाही आणि पैसेही परत करण्यात आले नाहीत. पैसे परत करण्यासाठी देण्यात आलेले धनादेशही वटले नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.