Vadodara Violence : गुजरातमध्ये दिवाळीत हिंसाचार! पोलिसांवर दगडफेक, फेकले पेट्रोल बॉम्ब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vadodara riots

Vadodara Violence: गुजरातमध्ये दिवाळीत हिंसाचार! पोलिसांवर दगडफेक, फेकले पेट्रोल बॉम्ब

वडोदरा : देशभरात दिवाळीचा उत्साह असताना गुजरातमधील वडोदऱ्यात दिवाळीच्या रात्री दोन धार्मिक गटांमध्ये हिंसाचाराची घटना घडली. यामध्ये जोरदार दगडफेकही झाली. यावेळी दंगलखोरांनी पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकले. पानीगेट भागात ही घटना घडली. (Vadodara Violence On Diwali an Incident Of Stone Pelting Occurred Near Muslim Medical Center)

पोलीस उपायुक्त यशपाल जगनिया यांनी सांगितलं की, घटनेची माहिती कळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि १९ लोकांना ताब्यात घेण्यात आलं. सर्वांकडे या घटनेबाबत चौकशी केली जात आहे. सध्या इथली परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. हिंसाचार झालेल्या भागातील हिंसाचाराची चौकशी केली जात आहे. तसेच प्रत्यक्षदर्शींकडे चौकशी केली जात आहे.

पेट्रोल बॉम्बच्या हल्ल्यात एक अधिकारी वाचले

वडोदराच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोषींवर कठोर करवाई केली जाईल. शहरात हिंसाचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. तर पेट्रोल बॉम्बच्या हल्ल्यात एक अधिकारी बचावला. या घटनेचे अनेक फोटो देखील समोर आले आहेत. या फोटोंमध्ये पोलिसांवर कशा प्रकारे पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले हे दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलिसांसाठी मोठं आव्हान

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी वडोदरासारख्या मोठ्या शहरात हिंसाचार घडला आहे. ही बाब पोलिसांसाठी मोठी आव्हानात्मक आहे. दरम्यान पोलीस उपायुक्तांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. आरोपींना पकडण्यासाठी अनेक जगांवर छापेमारी केली जात आहे.

टॅग्स :GujaratDesh newsDiwali