रियासी (जम्मू आणि काश्मीर) : त्रिकुटा पर्वतरांगेतील माता वैष्णोदेवी मंदिराकडे (Vaishno Devi Landslide) जाणाऱ्या नव्या मार्गावर सोमवारी झालेल्या जोरदार पावसानंतर भूस्खलनाची घटना घडली. या घटनेमुळे बॅटरी कार सेवा तात्पुरती थांबवण्यात आली असून, यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी मार्ग बदलण्यात आला आहे.