Vaishno Devi Yatra Suspended Amid Heavy Rains in J&K : गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच, अनेक भागांत ढगफुटी, भूस्खलन आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सततच्या पावसामुळे आणि हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने वैष्णोदेवीची यात्रा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.