बॉयफ्रेंडनं दिला धोका, गर्लफ्रेंडनं असा केला गावभर बोभाटा; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 14 February 2021

व्हॅलेंटाईन डे (Valentine Week) दिवशी प्रेमी जोडपे रोमँटिक पद्धतीने आपल्या प्रेमाला प्रकट करत असते.

व्हॅलेंटाईन डे (Valentine Week) दिवशी प्रेमी जोडपे रोमँटिक पद्धतीने आपल्या प्रेमाला प्रकट करत असते. पण, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील गोमतीनगरमध्ये प्रत्येक चौकात अशाप्रकारे पोस्टर्स लावलेत ज्याला पाहून लोक हैराण होत आहेत. शहरात लागलेल्या या पोस्टर्सकडे पाहून असंच वाटत आहे की, मुलाने मुलीला प्रेमामध्ये धोका दिला आहे. पोस्टर्सवर सिद्धी हेट्स शिवा 'Siddhi Hates Shiva'  असं लिहिण्यात आलं आहे. मुलीला कोणीतरी धोका दिला आहे. त्यामुळे मुलीने आपला राग व्यक्त करण्यासाठी शहरातील अनेक ठिकाणी पोस्टर्स लावले आहे. 

'जीर्ण झालेल्या न्यायव्यवस्थेत न्याय मिळत नाही; मी न्यायालयात जाणार नाही...

गोमतीनगर लखनऊचा असा भाग आहे, जेथे लोक फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. लोकांच्या आवडीच्या ठिकाणापैकी हे एक आहे. त्यामुळे हा भाग तरुण-तरुणींनी कायम गजबजलेला असतो. प्रत्येक ठिकाणी सिद्धी हेट्स शिवा असे पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यामुळे पोस्टर्स पाहणारे लोक बुचकळ्यात पडत आहेत. तसेच पोस्टर लावण्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी ते उत्सुक आहेत. असे असले तरी पोस्टर्स कोणी लावलेत याबाबत माहिती नाही. शहरात लावण्यात आलेले पोस्टर्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

सिद्धी हेट्स शिवा पोस्टर्स मागील सत्य जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. तसेच मुलीने पोस्टर लावले असल्यास तिला असं करण्याची गरज का पडली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अनेक ठिकाणी पोस्टर लावल्याने याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पोस्टर्सवर लिहिण्यात आलंय की सिद्धी हेट्स शिवा म्हणजे सिद्धी शिवाचा द्वेष करते. लोक हे पोस्टर्सचा आनंद घेताना दिसत आहेत. सोशल मीडियावर मजेशीर कमेट्स शेअर केले जात आहेत. 

Valentine Day Special: तिला विचारायचं धाडस करायला हवं होतं!

दरम्यान, काही महिन्यापूर्वी पुण्यामध्येही अशाच प्रकारचे पोस्टर्स पाहायला मिळाले होते. या पोस्टर्सशी चांगलीच चर्चा रंगली होती. हे पोस्टर्स एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लावण्यात आल्याचे नंतर स्पष्ट झाले होते. त्यामुळे लखनऊमध्ये लावण्यात आलेले पोस्टर्स जाहीरातीचाच प्रकार असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Valentine Week Siddhi Hates Shiva girlfriend boyfriend posters